शिमला, मनाली सोडा हो; यंदाच्या हिवाळ्यात ‘या’ प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट द्या, कमी पैशांमध्ये ट्रिप एन्जॉय करा !
Famous Tourist Spot In India : पर्यटकांसाठी हिवाळा हा ऋतू आनंदाची पर्वणी घेऊन येतो. ज्याप्रमाणे पावसाळ्यात पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेटी देतात त्याचप्रमाणे हिवाळ्यात देखील हजारो पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात.
अशा स्थितीत जर तुम्हीही हिवाळ्यात कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण हिवाळ्यात फिरता येण्यासारख्या काही प्रसिद्ध हिल स्टेशन बाबत जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या हिल स्टेशन विषयी जाणून घेणार आहोत त्यांच्यापुढे शिमला आणि मनाली देखील फिके पडणार आहे. निश्चितच आता तुम्हाला या हिल स्टेशन बाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
पचमढी : खरंतर, हिवाळ्यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी जात असतात. मात्र मध्यप्रदेश मध्ये देखील असे अनेक महत्त्वाचे हिल स्टेशन आहेत जेथे हिवाळ्यात भेटी दिल्या जाऊ शकतात. यामध्ये पचमढी या हिल स्टेशनचा देखील समावेश होतो. हे हिल स्टेशनं सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. ज्याप्रमाणे सह्याद्री माथ्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे, त्याचप्रमाणे सातपुड्याला देखील नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. यामुळे जर तुमचा हिवाळ्यात कुठे फिरायचा बेत असेल तर तुम्ही या हील स्टेशनला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.
तामिया : या ठिकाणाबाबत कदाचित तुम्हाला माहिती नसेल मात्र हे देखील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे हजारो लोक आपल्या सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी येतात. जर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कॉलिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.
मांडू : हे ठिकाण नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. या ठिकाणावरून नर्मदा नदीची सुंदरता नजरेस पडते. येथे तुम्ही आपल्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत भेट देऊ शकता.
भेडाघाट : नियाग्रा धबधबा तुम्ही पाहिलाच असेल. पण जर तुम्हाला मध्यप्रदेश मध्ये जाऊन नियाग्रा धबधबासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही भेडाघाट या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. या ठिकाणावर नर्मदा नदीचे पाणी उंचावरून पडते जे खूपच मनमोहक आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत भेट देऊ शकता.