फिरायला जाणार आहात ? गोव्यातील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या ! सुट्ट्याचा मनमुराद आनंद घेता येईल
Famous Tourist Spot In Goa : गोवा हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात. खरंतर येथे फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण आज आपण गोव्यामधील अशा काही हिडन पर्यटन स्थळांबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्याविषयी तुम्ही आतापर्यंत ऐकलेले नसेल.
वास्तविक गोव्याला लाभलेला अथांग समुद्र, नारळाच्या बागां कौलारू घरे हे येथील पर्यटनाची विशेष बाब आहे. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी भेटी देतात. प्रत्येक ऋतूत गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. पण उन्हाळ्यात गोव्याला जाणाऱ्यांची संख्या वाढते.
दरम्यान, जर तुम्हीही गोव्याला जाण्याचा प्लान बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण गोव्यातील अशा ठिकाणांबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्याविषयी अनेकांना अद्याप माहिती नाहीये.
गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
चोरला घाट : गोव्यातील हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. ज्या लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहणे आवडत असेल अशा लोकांसाठी हे ठिकाण फायदेशीर राहणार आहे. गोव्यातील हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. सध्या ऑक्टोबर हिट चा संपूर्ण देशात त्राहीमाम पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये गोव्याला करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट दिली पाहिजे.
सलौलीम धरण : हे धरण दक्षिण गोव्यात स्थित आहे. येथे गोव्यातील लोक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. मात्र गोव्याबाहेरील लोकांना या स्थळाबाबत अद्याप फारशी माहिती नाहीये. या धरणाच्या आजूबाजूच्या टेकड्या आणि दऱ्या धरणाची सुंदरता वाढवतात. यामुळे जर तुम्ही कधी गोव्याला गेलात तर या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.
अर्वलेम धबधबा : गोव्यातील दूध सागर धबधबा तुम्हाला माहितीच असेल. मात्र गोव्यातील दुध सागर धबधबा व्यतिरिक्त अर्वलेम धबधबा देखील खूपच प्रसिद्ध आहे. येथेही लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी भेट देतात. हा धबधबा 50 मीटर उंचीवरून खाली कोसळतो. धबधब्याचा आजूबाजूचा परिसर हिरवळीने नटलेला आहे. यामुळे जर तुम्ही गोव्याला गेलात तर येथेही नक्कीच भेट दिली पाहिजे.