Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

‘ही’ आहेत भारतातील स्वस्तात मस्त पर्यटन स्थळे ! एकदा अवश्य भेट द्या, कमी पैशात मिळणार विदेश वारीसारखा अनुभव

0

Famous Picnic Spot In India : भारतात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. आपल्या देशाला खूपच मनमोहक असे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. आपल्या देशात अनेक ऐतिहासिक वास्तू देखील आहेत. यामुळे भारताची सुंदरता ही इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे.

आपल्या देशातील ही सुंदरता पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आपल्या देशात हजेरी लावतात. दरम्यान आज आपण आपल्या देशातील काही प्रमुख पर्यटन स्थळाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे आम्ही ज्या पर्यटन स्थळाबाबत माहिती देणार आहोत त्या पर्यटन स्थळांना भेटी देणे हे खिशाला परवडणारे देखील राहणार आहे. म्हणजे आज आपण भारतातील स्वस्तात मस्त पर्यटन स्थळे कोणती आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कसोल : हे देशातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात. हिमाचल प्रदेश मध्ये वसलेले हे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. जर तुम्ही कधी हिमाचल प्रदेशला गेलात तर या ठिकाणाला एकदा अवश्य गेले पाहिजे. येथे तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत ट्रीपचे आयोजन करू शकता.

जयपूर : जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. हे शहर पिंक सिटी म्हणून विशेष ओळखले जाते. राजस्थानाची संस्कृती दर्शवणारे हे शहर पर्यटकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक या शहराला दरवर्षी भेटी देतात. येथे देशातील कानाकोपऱ्यातून पर्यटक भेटी देतात. येथे विदेशातूनही येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

नैनीताल : हे देशातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. जर तुम्ही ऑक्टोबर हिटमुळे परेशान झाला असाल तर या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या. हे उत्तराखंड राज्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. याच जम्मू कश्मीरमध्ये श्रीनगर हे फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन स्थित आहे. श्रीनगर मध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.