फिरायला निघताय पण बजेट कमी आहे, मग देशातील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट द्या; कमी पैशात ट्रिप एन्जॉय करा !
Famous Picnic Spot : सध्या देशातील काही राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. महाराष्ट्रसहित देशातील अनेक राज्यांमधून मान्सूनने माघार घेतली असल्याने तापमानात वाढ झाली असून यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये अनेकजन ट्रिपचे नियोजन आखत आहेत. बहुतांशी लोक विकेंडला फिरायचा प्लॅन बनवत आहेत. जर तुम्हीही वीकेंडला कुठे फिरण्यासाठी जात असाल परंतु बजेट कमी असेल तर आज आम्ही तुम्हाला कमी बजेट मध्ये फिरता येतील असे काही फेमस टुरिस्ट डेस्टिनेशनविषयी माहिती देणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता कमी पैशात फिरता येतील असे बेस्ट टुरिस्ट स्पॉट जाणून घेऊया.
ऋषिकेश : या यादीत पहिल्या क्रमांकावर ऋषिकेश हे ठिकाण येते. जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही वीकेंडला ऋषिकेश फिरण्याचा प्लॅन बनवू शकता. ऋषिकेश हे एक फेमस टुरिस्ट स्पॉट आहेत. येथे देशभरातुन हजारो पर्यटक हजेरी लावतात. येथे पर्यटकांची कायमच वर्दळ पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला वॉटर राफ्टींग, बंजी जंपिंग यांसारख्या ऍक्टिव्हिटीज देखील करता येतील.
लँसडाऊन : कमी बजेटमध्ये जर फिरायला निघणार असाल तर या ठिकाणाला तुम्ही आवर्जून भेट द्या. येथे तुम्ही कमी पैशात आपल्या ट्रीपला एन्जॉय करू शकणार आहात. या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ राहते. यामुळे जर तुम्हीही कुठं फिरण्याचा बेत आखत असाल तर या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.
जयपूर : या शहराला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. राजस्थानची राजधानी म्हणून हे शहर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. येथे जगभरातील पर्यटक हजेरी लावतात. जयपूर शहरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत. ही गुलाबी नगरी पर्यटकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. तुम्ही येथे हवा महल, सिटी पॅलेस, आमेर फोर्ट या ठिकाणाला भेट देऊ शकता. तुम्ही जयपुर ला आपल्या परिवारासमवेत देखील जाऊ शकता. मित्रांसोबत प्लॅन असेल तरी देखील जयपुर एक हॉट फेवरेट टुरिस्टिनेशन ठरेल. तुम्ही कमी बजेटमध्ये कुठे फिरण्याचा बेत आखात असाल तर या ठिकाणाला एकदा आवर्जून भेट द्या. तुमची ट्रिप नक्कीच सार्थकी लागेल यात शंकाच नाही.
कसोल : हिमाचल प्रदेशला नैसर्गिक सौंदर्याची खाण लाभली आहे. या राज्यात फिरण्यासारखी शेकडो ठिकाणे आहेत. यामध्ये कसोलचा देखील समावेश होतो. हे एक हॉट फेवरेट हिल स्टेशन आहे. पर्यटकांमध्ये हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे. जर तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या भीषण उष्णतेमुळे परेशान झाला असाल तर या ठिकाणाला एकदा आवर्जून भेट द्या तुमचा सर्व थकवा यामुळे दूर होणार आहे हे नक्की.