मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही राज्यच केले आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खूप आवडतो. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेतून एका कलाकाराची एग्झिट होणार आहे.

मालिकेत यशच्या आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांची एग्झिट होणार असल्याचं कळतंय.
तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे त्यांच्या जागी आता एका नव्या अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे. अभिनेते प्रदीप वेलणकर हे मालिकेत मोहन जोशींची जागा घेतील, असं वृत्त आहे. जग्गू आजोबांची भूमिका आता ते साकारतील.

दरम्यान, पुढे या मालिकेत यश नेहाला लग्नाची मागणी घालणार आहे. मात्र नेहाच्या होकारापूर्वी त्याला परीचा होकार मिळवायला लागणार आहे. हीच यशसाठी कठीण परीक्षा आहे. परी चक्क यशचा इंटरव्ह्यू घेणार आहे. मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये परी यशचा इंटरव्ह्यू घेताना दिसते. त्यामुळे यश या परीक्षेत कसा पास होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे