Excise Duty : (Excise Duty) सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर आहे. आता इथेनॉल आणि बायो-डिझेलच्या मिश्रणाशिवाय विकल्या जाणार्‍या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवर (Diesel) प्रति लिटर 2 रुपये उत्पादन शुल्क लागू करण्याचा निर्णय सरकारने पुढे ढकलला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आता वाढणार नाहीत. जाणून घ्या कधी पासून लागू होतील हे नवीन दर.

वित्त मंत्रालयाने जारी केलेली माहिती

केंद्रीय वित्त मंत्रालयाने (Union Finance Ministry) शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या राजपत्र (Gazette) अधिसूचनेत म्हटले आहे की, पेट्रोलवरील अतिरिक्त शुल्क आता 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल. त्याच वेळी, डिझेलवरील हे शुल्क आता 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल.

उत्पादन शुल्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात इथेनॉल आणि बायो-डिझेलच्या मिश्रणाशिवाय विकल्या जाणार्‍या पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 2 रुपये प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू केले होते.

हे उत्पादन शुल्क 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होते, परंतु आता ते 1 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तर डिझेलसाठी हा निर्णय 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

अतिरिक्त शुल्क आकारण्याची तयारी

इथेनॉल आणि बायो-डिझेलचे मिश्रण असलेल्या इंधनाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नॉन मिक्स पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त शुल्क लावण्याच्या तयारीत होते. मात्र नंतर ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या परदेशातून कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील कच्च्या तेलाची आयात कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे बायो डिझेलमध्येही डिझेल मिसळले जात आहे.