मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात क्युट जोडी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील पाली हिल्स येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये दोघांचे लग्न झाले. तेव्हापासून या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींपासून दोघांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर त्यांच्या लग्नाच्या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा पाठवल्या. दिपिकाने लिहिले, ‘तुम्हा दोघांनाही आयुष्यभर प्रेम, प्रकाश आणि हास्याच्या शुभेच्छा’. यानंतर अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आलियाचा फोटो टाकून लग्नाला शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नाही तर तिचा पती विकी कौशलनेही आलियाचे अभिनंदन केले आहे.

तसेच, सोनम कपूरने आलियाच्या पोस्टवर कमेंट करून दोघांना लग्नाबद्दल अभिनंदन केले आणि लिहिले, “तुम्हा दोघांचे अभिनंदन! दोघेही सुंदर दिसत आहेत.” अश्या रणबीरच्या सर्व एक्स गिर्लफ्रेंड्सने दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याय या प्रतिक्रिया सध्या खूप चर्चेत आल्या आहेत.