मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काल 14 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. या भव्य विवाहसोहळ्याचे फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी कमेंट करत या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. मात्र, यात रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आलियाच्या या पोस्टवर कमेंट करताना कतरिनानं कमेंट करत लिहिलं की, ‘तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. खूप सारं प्रेम, मी तुमच्या आनंदाची कामना करते. तुमचं आयुष्य आनंदानं बहरुन जावं हीच इच्छा.’ एकेकाळी रणबीर कपूरची गर्लफ्रेंड असेल्या कतरिना कैफची आलियाच्या फोटोवरील ही कमेंट सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.

दरम्यान, आलियानं हे फोटो शेअर करताना, ‘आज आमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या समोर, आमच्या घरी… बाल्कनीतील आमच्या आवडत्या ठिकाणी… जिथे आम्ही पाच वर्षे एकमेकांसोबत व्यतित केली त्याच ठिकाणी आज आम्ही लग्न केले. या जागेसोबत आमच्या असंख्य आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि भविष्यातही अनेक आठवणी जोडल्या जातील. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम, रणबीर आणि आलिया.’ असे खास कॅप्शन लिहिले आहे. आलियाची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे.