मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या बातमीवर अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री दीपिका पदुकोणने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने अयान मुखर्जीच्या पोस्टद्वारे आपली प्रतिक्रया दिली आहे. दिग्दर्शकाने या जोडप्याच्या लग्नाची पुष्टी केली होती. दीपिकाने अयानची हीच पोस्ट लाईक करून दोघांनाही प्रेम पाठवले आहे. हे जोडपं 14 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर हिने याला दुजोरा दिला आहे.
13 एप्रिल रोजी, आलिया-रणबीरच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याच्या दिवशी, दिग्दर्शक अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया तेरा इश्क’ गाण्याचा टीझर रिलीज करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. हा व्हिडिओ एक प्रकारे या दोघांच्या लग्नाची घोषणाच होता. ज्याद्वारे अयानने दोघांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. व्हिडिओमध्ये आलिया आणि रणबीर वाराणसीच्या रस्त्यांवर रोमान्स करताना दिसत आहेत. ज्यावर अनेक बॉलिवूड स्टार्सनी कमेंट करून दोघांना प्रेम पाठवले.
अयान मुखर्जीची पोस्ट लाईक करणाऱ्या लोकांच्या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही नाव आहे. रणबीर-आलियाचा रोमँटिक टीझरही दीपिकाला आवडला आहे. दीपिकाने अद्याप लग्नाबद्दल सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही.
दीपिका व्यतिरिक्त ज्यांनी पोस्ट लाइक केली त्यात अनुष्का शर्मा, अभिषेक बच्चन, मलायका अरोरा, सुहाना खान, काजोल आणि अनन्या पांडे यांचा समावेश आहे.
एक काळ असा होता की दीपिका आणि रणबीर एकमेकांना डेट करायचे. याशिवाय दीपिका आणि रणबीरने ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले.
रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले आणि आता ती तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूर आपल्या लव्ह लाईफची सुरुवात अभिनेत्री आलियासोबत करणार आहे. आज रणबीर आलियासोबत लग्नगाठ बांधणार आहे.