arjun tendulkar
"End internship", fans demand Tendulkar's debut

मुंबई : पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ चा सीझन निराशाजनक आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईचा संघ एका मोसमातील पहिले तीन सामने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. KKR विरुद्ध गोलंदाजांची कामगिरी फारशी चांगली नव्हती त्यामुळे संघाचा कर्णधार रोहित शर्माची झोप उडाली आहे.

केकेआरविरुद्ध पराभव मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा खेळाडू अर्जुन तेंडुलकर सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. आता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाची मागणी चाहत्यांनी जोर धरायला सुरुवात केली आहे. सॅम्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहते तेंडुलकरला त्याच्या जागी स्थान देण्याची मागणी करत आहेत.

अर्जुनही सॅम्ससारख्या डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि गरज पडल्यास लांब फटकेही मारतो. मात्र, आतापर्यंत त्याला मुंबईने बेंचवरच बसवले आहे. आता अर्जुनला आणण्याची वेळ आली आहे, असे अनेक चाहते म्हणत आहेत. एका चाहत्याने तर मुंबई संघाची खिल्ली उडवली आणि अर्जुनला सॅम्सच्या जागी आणा, त्याला इंटर्नशिपसाठी का ठेवले आहे. असे प्रश्न आता चाहत्यांनी उपस्थित केले आहेत.