Electric Vehicles : (Electric Vehicles) पेट्रोलला पर्याय आणि प्रदूषणावर आळा म्हणून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आहे. मात्र येत्या एका वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांनी म्हटले आहे. जाणून घ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी त्यांचा प्लॅन.

“सरकार पेट्रोल आणि डिझेलऐवजी पिकांच्या अवशेषांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला (Ethenol)प्रोत्साहन देत आहे. विशेषत: बिहारमध्ये इथेनॉलच्या संदर्भात खूप प्रचार केला जात आहे, त्यासाठी वेगवेगळ्या भागात नवीन नवीन प्लांट्स बांधले जात आहेत. यासाठी मी प्रयत्न करत आहे.

1 वर्षाच्या आत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत देशातील पेट्रोल वाहनांच्या किमतीएवढी होईल आणि आम्ही जीवाश्म इंधनावर खर्च होणारा पैसा वाचवू. असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय गडकरी (Nitin Gadakari) म्हणाले की, “रस्त्यांच्या तुलनेत जलमार्ग हे स्वस्त वाहतुकीचे साधन आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर समोर येणार आहे. तथापि, इलेक्ट्रिक वाहनांचा संबंध आहे, Tata (Tata) Nexon EV हे सध्या देशातील चारचाकी विभागात टाटा मोटर्सचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक वाहन आहे, ज्याची किंमत 14.79 लाख ते 19.24 लाख रुपये आहे.

ते म्हणाले की, “लवकरच मी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रक लाँच करेन. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता अनेक पटींनी वाढेल. गडकरी म्हणाले की, बजाज, टीव्हीएस आणि हिरोने इलेक्ट्रिक बाइक्स आणल्या आहेत आणि इलेक्ट्रिक रिक्षाही रस्त्यावर आहेत. ते म्हणाले की 2025 पर्यंत ऑटोमोबाईल उद्योगाची एकूण उलाढाल सध्याच्या 6.5 लाख कोटी रुपयांवरून सुमारे 15 लाख कोटी रुपयांवर पोहोचेल.