Electric Scooter : देशातील इलेक्ट्रिक स्कुटरची मागणी पाहता, बॅटरी बनवणारी कंपनी ओकाया (Okaya) ने आपल्या इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. जाणून घ्या या इलेक्ट्रिक स्कुटरचे सर्व फीचर्स.

देशात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Scooter) लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यापैकी, विशेषत: इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता आणि मागणी, कारण त्यांची किंमत इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक मोटरसायकलपेक्षा कमी आहे. हा ट्रेंड लक्षात घेऊन देशातील बॅटरी निर्माती कंपनी ओकायानेही इलेक्ट्रिक स्कूटर सादर करून या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने देशात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Fasst F2B आणि Fasst F2T सादर केल्या आहेत.

डिझाइन आणि वैशिष्ट्ये

कंपनीच्या या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर स्पोर्टी डिझाइनसह सादर करण्यात आल्या आहेत. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये CBS ब्रेकिंग सिस्टम, डिजिटल ट्रिपमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, रिव्हर्स मोड, अँटी थेफ्ट सिस्टम, स्टार्ट/स्टॉप बटण, घड्याळ, 3 राइडिंग मोड (इको, सिटी आणि स्पोर्ट्स) आणि इतर उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील आहेत.

पॉवरट्रेन

या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.2kWh LFP बॅटरी पॅकसह 2000W इलेक्ट्रिक मोटर वापरतात. एकाच चार्जिंगवर, दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सना 70-80 किमी पर्यंतची राइडिंग रेंज मिळते. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 70kmph आहे.

किंमत

जर तुम्हाला ओकाया कंपनीचा फास्ट एफ2बी घ्यायचा असेल तर तुम्हाला 89,999 रुपये खर्च करावे लागतील. तर, फास्ट F2T खरेदी करण्यासाठी 84,999 रुपये खर्च करावे लागतील. या सणासुदीच्या हंगामात तुम्ही कोणत्याही ओकाया शोरूमला भेट देऊ शकता आणि या इलेक्ट्रिक स्कूटर्स तुमच्या घरी आणू शकता.