Electric Scooter :(Electric Scooter) सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून या इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर घ्याचा विचार करत असाल तर या स्कूटर उत्तम पर्याय आहेत.

ओला S1

ओलाने या (Ola S1) स्कूटरमध्ये 8.5 kW ची मोटर वापरली आहे, जी 3 kWh च्या बॅटरीला जोडलेली आहे. ही मोटर 58 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते.

ही स्कूटर एका चार्जमध्ये 181 किमी पर्यंत धावू शकते. यात 7-इंचाचा टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एकाधिक डिस्प्ले मोड, इनबिल्ट GPS नेव्हिगेशन, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटीसाठी समर्थन आणि तीन राइडिंग मोड्ससह बरेच काही मिळते.

Hero Electric Optima CX

Hero च्या (Hero Electric Optima CX) या इलेक्ट्रिक स्कूटरला 550W BLDC मोटर मिळते जी 52.2V, 30Ah लिथियम फॉस्फेट बॅटरीशी जोडलेली आहे. ही मोटर 1.2 kW चे पॉवर आउटपुट देते. ही स्कूटर एका चार्जवर 140 किमी पर्यंत धावू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 45 किमी प्रतितास आहे.

या स्कूटरला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. यात वॉक असिस्ट फंक्शन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, अँटी थेफ्ट अलार्म, रिमोट लॉक, रिव्हर्स मोड आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Ampere Magnus EX 

या अँपिअर स्कूटरला 1.2 kW ची मोटर मिळते. तसेच यामध्ये 60V, 30Ah बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये अँटी थेफ्ट अलार्म, एलसीडी स्क्रीन, कीलेस एंट्री, यूएसबी पोर्ट आदी फीचर्स उपलब्ध आहेत. ही स्कूटर ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावू शकते. FAME-II सबसिडी 2021 लागू झाल्यापासून स्कूटरची किंमत 9000 रुपयांनी कमी झाली आहे.