Electric Scooter : (Electric Scooter) देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनाकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याचा विचार करत असाल तर या आहेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर.

Hero (Hero) Electric Optima CX 3 यासाठी तीन रंगाचे पर्याय आहेत. कंपनीचा दावा आहे की या स्कूटरला 45 किमी प्रतितासचा टॉप स्पीड आणि 82 किमीची रेंज मिळते. त्याची बॅटरी 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होते. त्याची किंमत 62,190 रुपये आहे.

बाऊन्सची (Bounce) ही स्कूटर 2 KWH 48V बॅटरीसह येते, ज्याचा टॉप स्पीड 65Kmph आहे आणि त्याची रेंज 85 kms आहे. ड्रॅग मोड, इको मोड आणि पॉवर या तीन रायडिंग मोडमध्ये हे उपलब्ध आहेत. स्पोर्टी रेड, स्पार्कल ब्लॅक, पर्ल व्हाईट, दसत सिल्व्हर आणि कॉमेट ग्रे कलर पर्यायांसह ही स्कूटर तुम्हाला बाजारात मिळेल. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही 45,099 रुपयांना बॅटरीशिवाय व्हेरिएंट खरेदी करू शकता. त्याच वेळी, बॅटरी पॅकसह व्हेरिएंटची किंमत 68,999 रुपये आहे.

Avon (Avon) E Scooter ला 215W BLDC आणि 40V/20ah बॅटरी मिळते. त्याची बॅटरी 6 ते 8 तासांत पूर्ण चार्ज होते. त्याचबरोबर कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 65 किमीची रेंज देऊ शकते. त्याचा टॉप स्पीड 24 किमी प्रतितास आहे. किंमतीबद्दल बोलायचे तर, तुम्ही दिल्लीमध्ये 45,000 रुपयांना खरेदी करू शकता.

Okinama (Okinama) R30 ची श्रेणी 60 किमी आणि कमाल वेग 25 किमी प्रतितास आहे. यात 250 W ची मोटर मिळते. यात 1.34KWH लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. त्याची किंमत सुमारे 61,420 रुपये आहे.