Electric Scooter :(Electric Scooter) दिवाळी निम्मित ओलाने आपल्या S1 Pro (Ola S1 Pro) या इलेक्ट्रिक स्कुटरवर भरघोस डिस्काउंट दिला आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढता कल लक्षात घेऊन ओलाने दिवाळीनिमित्त ही ऑफर दिली आहे.

सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 3,435 इलेक्ट्रिक स्कूटर विकणाऱ्या OLA (OLA) ने सप्टेंबरमध्ये 9,616 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त मागणी आहे. या कारणास्तव ओलाने सणासुदीपासून ग्राहकांना बंपर डिस्काउंट ऑफर दिली आहे. Ola त्यांच्या S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांची पूर्ण सूट देत आहे.

ओला, ओकिनावा आणि हिरो

OLA, Okinawa, Hero Electric, Ather Energy आणि Ampere यांनी सप्टेंबर 2022 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकणाऱ्या टॉप पाच कंपन्यांमध्ये आघाडीवर आहे. या सर्व कंपन्यांना सप्टेंबर महिन्यात 5,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्यात यश आले. दुसरीकडे, टीव्हीएस आणि बजाज सारख्या मोठ्या कंपन्या 3,932 युनिट्स आणि 2,577 युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या पाचपासून मागे राहिल्या.

इतकी मिळणार सूट

ओलाने (OLA) या सणासुदीच्या हंगामात आपली इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro मॉडेल 10,000 रुपयांनी कमी केले आहे जेणेकरून कंपनी ग्राहकांचे लक्ष वेधून विक्री आणखी वाढवू शकेल. किमतीत कपात केल्यानंतर Ola च्या S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपयांवर गेली आहे, परंतु कंपनीने ही ऑफर दसऱ्यापर्यंत (5 ऑक्टोबर) ठेवली आहे. त्यानंतर ही स्कूटर मूळ किमतीतच उपलब्ध होईल.

मे महिन्यात, Ola Electric ने S1 Pro मॉडेलच्या किंमती वाढवण्याचे कारण स्पष्ट न करता एकाच वेळी 10,000 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपये होती, तर S1 Pro ची किंमत 15 ऑगस्ट 2021 ला लॉन्चच्या दिवशी 1.30 लाख रुपये ठेवण्यात आली होती.