Electric Scooter : (Hero MotoCorp) Hero MotoCorp ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये लॉन्च केली असून लुक्स पासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या या स्कुटरची(Scooter) खासियत.

Hero MotoCorp, भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. हीरोची उपकंपनी विडा (Vida) या कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली आहे.

हिरोच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स Vida V1 Plus आणि Vida V1 Pro या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील. तर Hero MotoCorp ची इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1, TVS iQube, Bajaj Chetak, Ather 450X सारख्या स्कूटरशी स्पर्धा करेल.

पॉवर पॅक

हिरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन पॉवर-पॅकमध्ये सादर करण्यात आली आहे. पहिली 34 kWh आहे आणि दुसरी 4 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे ज्याची रेंज 150 किमी पर्यंत आहे, जी प्रत्येक वेरिएंट्स नुसार वेगळी वेगळी असेल.

किंमत

Hero MotoCorp इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 1.45 लाख ते 1.59 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे, जी वेरिएंटनुसार बदलेल.

पॉवर रेंज

Vida V1 PRO चा टॉप स्पीड 80 kmph आहे आणि ही स्कूटर फुल चार्जिंगवर 165 किमी अंतर कापण्यास सक्षम असेल. त्याच वेळी, या स्कूटरमध्ये केवळ 32 सेकंदात 0.40 किमी प्रतितास वेग पकडण्याची क्षमता आहे.

Vida V1 PLUS या स्कूटरचा टॉप स्पीड देखील 80 kmph आहे. पूर्ण चार्ज केल्यावर, ही स्कूटर 143 किमी अंतर कापू शकते आणि ही स्कूटर केवळ 3.4 सेकंदात 0.40 किमी प्रतितास वेग देखील पकडू शकते.

चार्जिंग नेटवर्क

आपल्या ग्राहकांना लक्षात घेऊन, कंपनीने विडा चार्जिंग स्टेशन्स देखील स्थापित केले आहेत जेणेकरुन विडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या वापरकर्त्यांना चांगली चार्जिंग सुविधा दिली जाऊ शकते. Hero Vida घेणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय म्हणून काम करेल.