Electric Scooter : अनेक कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपल्या स्कुटर आणि कार तयार करत आहेत. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कुटर (Electric Scooter) घेण्याचा विचार करत असाल Hero Vida V1 आणि TVS iQube या दोन इलेक्ट्रिक स्कुटर उत्तम पर्याय आहेत. जाणून घ्या कोणती आहे बेस्ट.

Hero Vida V1 vs TVS iQube बॅटरी पॅक

Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने 3.94kWh चा बॅटरी पॅक वापरला आहे. ही बॅटरी एका चार्जमध्ये 143 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. Hero Vida ची बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 65 मिनिटे लागतात. दुसरीकडे, जर आपण TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरी पॅकबद्दल (TVS iQube) सांगायचे तर तुम्हाला त्यात 2.25kWh ची बॅटरी देखील मिळेल. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 75 किमी पर्यंत चालवू शकता.

Hero Vida V1 vs TVS iQube वैशिष्ट्ये

Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये संगीत नियंत्रण, कॉल/SMS अलर्ट, अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स, USB चार्जिंग पोर्ट्स, पार्किंग सहाय्य, आपत्कालीन इशारा, फॉलो मी होम हेडलॅम्प्स, राइडिंग मोड्स सारखी अनेक आधुनिक वैशिष्ट्ये. आणि (Hero Vida V10) ट्रॅक माय बाईक देखील उपलब्ध आहेत. दुसरीकडे, जर तुम्ही TVS iQube मध्ये दिलेल्या फीचर्सची यादी पाहिली तर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LED DRL, USB चार्जिंग सॉकेट, लार्ज अंडरसीट स्टोरेज, एक मोठा फूटबोर्ड, TVS SmartXonnect फंक्शन आणि नेव्हिगेशन यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.