Electric Scooter : (Electric Scooter) सध्या इलेकट्रीक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे एथर एनर्जी या इलेक्ट्रिक स्कुटर बनवणाऱ्या कंपनीने आपल्या Ather 450X Gen 3 इलेक्ट्रिक स्कूटरची फ्लिपकार्टद्वारे (Flipkart) ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. यामुळे आता ही स्कुटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. फ्लिपकार्टद्वारे ही स्कुटर घरपोच केली जाणार असून, जाणून घ्या या स्कुटरचे सर्व फीचर्स.

247% ची उच्च विक्री

अथर एनर्जी (Ather Energy) कंपनीसाठी सप्टेंबर हा महिना विक्रीच्या दृष्टीने उत्तम राहिला आहे. कंपनीने या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 247% ची वार्षिक वाढ नोंदवली आहे. याशिवाय कंपनीने 4 नवीन एक्सपिरियन्स सेटर (रांची, कोलकाता, मुंबई आणि राजकोटमध्ये) उघडले आहेत. त्याच वेळी, एथर एनर्जी ही केरळमधील 34% मार्केट शेअरसह प्रथम क्रमांकाची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी आहे. 34% मार्केट शेअरसह कंपनी केरळमध्ये अव्वल आहे.

Ather 450X पॉवर रेंज

Ather Energy  (Ather 450 Gen 3) कडे सध्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर 450 Plus आणि 450X भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. 450X स्कूटरला 3.7kWh लिथियम-आयन बॅटरी-पॅक चार राइडिंग मोड – इको, राइड, स्पोर्ट्स, वार्प मिळतात. ही स्कूटर केवळ 3.3 सेकंदात 40kmph चा वेग पकडण्यास सक्षम आहे. 450X स्कूटरचा टॉप स्पीड 80 kmph आहे. त्याच वेळी, त्याची शक्ती श्रेणी 146 किमी आहे. त्याची किंमत 1,55,657 रुपये (एक्स-शोरूम, बंगलोर) आहे.

कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450+ ची पॉवर रेंज 85 किमी आहे आणि ही स्कूटर 3.9 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. 450X ची स्पर्धा Ola च्या S1 Pro, TVS iQube, बजाज चेतक आणि Simple Energy One इलेक्ट्रिक स्कूटरशी आहे.