Electric Scooter : (Electric Scooter) ओलाने आपल्या S1 Pro (S1 Pro)या इलेक्ट्रिक स्कुटरवर डिस्काउंट दिला आहे. एका पोस्टद्वारे ओलाने (Ola) याबद्दल माहिती दिली असून, येणाऱ्या फेस्टिवल निम्मित ही ऑफर देण्यात येत आहे. जाणून घ्या ही ऑफर कशी मिळवायची

Ola S1 Pro ची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपये आहे. या ऑफर अंतर्गत, Ola S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरवर ₹ 10,000 ची सूट देत आहे. कंपनीने सोशल मीडियाद्वारे ही सवलत ऑफर जाहीर केली, ज्यामध्ये ओलाने एका पोस्टमध्ये लिहिले, “ओलाच्या सणाच्या ऑफरचा पुरेपूर फायदा घ्या आणि Ola S1 Pro च्या खरेदीवर ₹10,000 च्या सवलतीसह सण साजरा करा.” या स्कूटरवर फायनान्सिंगचा पर्यायही उपलब्ध आहे.

कंपनीच्या या सवलतीच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ओलाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून फेस्टिव्ह ऑफर्स टॅब निवडावा लागेल. मग ही स्कूटर सवलतीत खरेदी करण्याचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.30 लाख रुपये असेल. उर्वरित खरेदीचे नियम पूर्वीसारखेच आहेत.

रेंज

स्कूटर (S1 Pro) 116 kmph च्या टॉप स्पीडवर टॉप आउट करू शकते आणि हा 0 ते 40 kmph वेग गाठण्यासाठी फक्त 3 सेकंद लागतात. ही स्कूटर एका चार्जमध्ये 170-180 किमी पर्यंत धावू शकते.

चार्जिंगची वेळ

या स्कूटरमध्ये 4 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. जे 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 6 तास 30 मिनिटे लागतात. ही स्कूटर भारतीय बाजारपेठेतील Ather 450X Gen 3 इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करते.