Electric Cars : इलेक्ट्रिक वाहनांची मागणी (EV) दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर, या काही कार्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. जाणून घ्या

TATA Tiago

टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक सेगमेंटचा विस्तार करताना अलीकडेच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Electric Cars) Tata Tiago लाँच केली. या कारची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

TATA Tigor

 

टाटा टिगोर ही टाटा मोटर्सची अलीकडेच लाँच केलेली इलेक्ट्रिक सेडान कार आहे. 26 kWh लिथियम-आयन बॅटरी असलेल्या या कारची किंमत 12.24 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

TATA NEXON

टाटा नेक्सॉन या टाटाची तिसरी इलेक्ट्रिक कार असलेल्या इलेक्ट्रिक व्हर्जनला चांगली मागणी आहे. या कारची किंमत 14.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Hyundai Kona

Hyundai ची 392 kWh लिथियम-आयन पॅक्ड इलेक्ट्रिक कार Hyundai Kona देखील एक चांगला पर्याय आहे. ही कार 23.84 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

BYD eSix

BYD इलेक्ट्रिक कार BYD eSix 717 kWh च्या बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. कंपनी ही कार 29.15 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विकत आहे.