Electric Car : (Electric Cars)सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत चालली आहे, यामुळेच टाटाने आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनेही तुम्हाला पेट्रोलच्या खर्चापासून वाचवतात आणि त्यांचा देखभालीचा खर्चही कमी असतो. यामुळेच इलेक्ट्रिक वाहनकडे कल वाढत चालला आहे.

Tata Tiago

Tata Tiago (Tata Tiago) ला भारतात खूप पसंदी आहे. ही एक हॅचबॅक कार असून. सुरक्षेच्या बाबतीतही या कारला चांगले रेटिंग मिळाले आहे. आता कंपनी भारतात या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्ट्सनुसार, ही कार या महिन्याच्या 28 तारखेला लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीने या कारमध्ये 26kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरला आहे. एका चार्जमध्ये ही कार 302 किमीपर्यंत चालवता येते.

Citroen C3 EV (Citroen C3 EV)

Citroen च्या C3 या कारचे लवकरच EV आवृत्तीमध्ये लॉन्च होणार आहे ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची कार असेल. रिपोर्ट्सनुसार, ही कार मार्च 2023 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते.

कंपनी डिसेंबर महिन्यात या कारमधून पडदा उचलेल आणि यादरम्यान कंपनी त्याच्या किंमती आणि वैशिष्ट्यांवरून पडदा उचलू शकते. कंपनीने या कारमध्ये 50kWh बॅटरी वापरली आहे आणि ही कार सिंगल चार्जमध्ये 300-350 किमीची रेंज देऊ शकते. त्याची सुरुवातीची किंमत 10-12 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

MG EV 

MG लवकरच भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची कार असेल. ही बजेट फ्रेंडली एसयूव्ही असेल. रिपोर्ट्सनुसार, कंपनी जून 2023 पर्यंत ही कार भारतात लॉन्च करू शकते. एका चार्जमध्ये ही कार 250-300 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. या कारची किंमत 10 ते 12 लाख रुपये असू शकते.