Electric Car : (Electric Car) Xiaomi (Xiaomi) ही कंपनी लवकरच आपली सेल्फ ड्रायविंग इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणणार आहे. ही कार 2024 पर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

Xiaomi सेल्फ -ड्रायव्हिंगसह (Self Driving) सुसज्ज असलेल्या इलेक्ट्रिक वाहनावर काम करत आहे, जे 2024 पर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे. Xiaomi चे CEO, Lei Jun अजूनही इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करून चांगले काम करण्याची आशा करत आहेत, ज्यासाठी कंपनी आता फोन-डोअर सेडान कारमध्ये इन-हाउस सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या कारवर काम करत आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे की कंपनी चीनच्या यिजुआंग येथील Xiaomi च्या ऑटोमोटिव्ह प्लांटमध्ये ही इलेक्ट्रिक कार बनवेल. याशिवाय या आगामी कारच्या किमतीचाही अंदाज लावला आहे.

दरम्यान ही कार Xiaomi चीनच्या Yijuang येथे असलेल्या त्यांच्या ऑटोमोटिव्ह प्लांटमध्ये बनवली जाणार असून, या कारची किंमत सुमारे 150,000 युआन म्हणजे सुमारे 17 लाख रुपये असेल. कंपनीने आपल्या या टेकनॉलॉजिला Xiaomi पायलट असे नाव दिले आहे.

आणि सध्या याच्या चाचणी सुरु आहेत. यामुले कदाचित हे नाव पुढे बदलले जाऊ शकते. हे तंत्रज्ञान LIDAR वर आधारित आहे आणि यामध्ये Xiaomi च्या AT128 हायब्रिड सॉलिड-स्टेट रडार प्रणालीचा समावेश आहे.

Xiaomi ने अद्याप या EV बाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. लॉन्च झाल्यानंतर लवकरच ही कार जागतिक बाजारपेठेसाठी उपलब्ध होईल किंवा ती फक्त चीनमध्ये विकली जाईल हे देखील सध्या अस्पष्ट आहे.

टेस्लासह अनेक कंपन्या आधीच चीनमध्ये सेल्फ-ड्रायव्हिंग कार विकत आहेत. अशा परिस्थितीत, हे पाहावे लागेल की जर Xiaomi ने आपली आगामी इलेक्ट्रिक कार लाँच केली तर ती बाजारात उपलब्ध असलेल्या इतर दिग्गजांशी कशी स्पर्धा करते.