Volvo XC40 Recharge P8 AWD in Glacier Silver,

Electric Car : वॉल्वो या कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक लग्जरी कार लॉन्च केली आहे. या कारचे सर्व फीचर्ससुद्धा लग्जरी आहेत. जाणून घ्या या कारचे (EV)सर्व डिटेल्स.

कंपनीने व्होल्वोच्या नुकत्याच लाँच झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक (Electric Car) SUV Volvo XC40 रिचार्जचे पहिले युनिट भारतात आणले आहे. कंपनीने ही लक्झरी कार 55.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. ही कार तिच्या पेट्रोल आवृत्तीपेक्षा सुमारे 11.40 लाख रुपये महाग आहे. त्याच वेळी, कंपनी या कारसाठी 418 किमी पर्यंत बॅटरी-रेंजचा दावा करत आहे. या लक्झरी कारची खास गोष्ट म्हणजे ही व्होल्वोची देशातील असेंबल झालेली पहिली कार आहे.

पॉवर पॅक

ही (Volvo XC40 Recharge) लक्झरी कार कंपनीने भारतात 55.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) लाँच केली आहे. किंमतीच्या बाबतीत, ही कार तिच्या पेट्रोल आवृत्तीपेक्षा सुमारे 11.40 लाख रुपये महाग आहे. कंपनी या इलेक्ट्रिक SUV कारवर 3 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 8 वर्षांपर्यंतची वॉरंटी देत ​​आहे. कंपनी या इलेक्ट्रिक SUV सोबत 11 kW चा वॉल-बॉक्स चार्जर देखील देत आहे.

दुसरीकडे, या कारची (Volvo) बॅटरी, पॉवर आणि रेंजबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 78 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. जे एका पूर्ण चार्जवर 418 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या लक्झरी इलेक्ट्रिक SUV कारची बॅटरी 150 kW DC फास्ट चार्जरने केवळ 33 मिनिटांत 80 टक्के चार्ज करता येते. त्याच वेळी, 50 kW फास्ट चार्जरसह ते 2.5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकते.

वैशिष्ट्ये

या लक्झरी कारमध्ये (Volvo XC40 recharge) कंपनीने 2 इलेक्ट्रिक मोटर्स वापरल्या आहेत. जे 408 bhp ची कमाल शक्ती आणि 660 NM सर्वाधिक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. याशिवाय ही कार केवळ 4.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितासचा वेग पकडू शकते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये नवीन थोर हॅमर डीआरएल, ब्लॅक आउट फ्रंट ग्रिल, नवीन 19-इंच अलॉय व्हील यांसारख्या बाह्य वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला आहे.

त्याच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, पॉवर फ्रंट सीट, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, लेव्हल 2 अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), हरमन कार्डन साउंड सिस्टम यांसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.