Electric Car: ब्रिटिश लक्झरी कार निर्माता रोल्स रॉयस (Rolls Royce) देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. Rolls Royce ने आपली पहिली लक्झरी इलेक्ट्रिक कार स्पेक्टरचे अनावरण केले आहे. ही ऑटोमेकर आत्तापर्यंत केवळ पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनवते. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

स्पेक्टर

लक्झरी कारमध्ये सर्वाधिक मानांकित कार निर्माता कंपनी रोल्स रॉइसनेही इलेक्ट्रिक कारच्या (Electric Car) बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार स्पेक्टर रोल्स रॉयसने सादर केली आहे. ही कार कंपनीच्या फॅंटम कूपवर आधारित असेल. कार पूर्णपणे अॅल्युमिनियम स्पेसफ्रेमवर बनवली आहे.

वैशिष्ट्ये

रोल्स रॉयसच्या इतर कारच्या तुलनेत या इलेक्ट्रिक कारमध्ये (EV) सर्वात रुंद लोखंडी जाळी दिसेल. या कारला 23 इंच चाके, हाय माउंटेड अल्ट्रा स्लिम एलईडी डीआरएल, हेडलॅम्प क्लस्टर, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन मिळेल. दोन-दरवाजा असलेली ही इलेक्ट्रिक कूप स्टाईल कार एअरोडायनामिक्सवर विशेष लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आली आहे.

पॉवरट्रेन

या लक्झरी इलेक्ट्रिक कारची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे, ज्यामध्ये ती 2.5 दशलक्ष किलोमीटरहून अधिक चालवण्यात आली आहे. सध्या रोल्स रॉयसने याबाबत फारशी माहिती उघड केलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 585 bhp पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 520 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे आणि केवळ 4.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.

कधी सुरू होणार?

रोल्स रॉयसने या इलेक्ट्रिक कारच्या लॉन्चबाबत काहीही खुलासा केलेला नाही. पण अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही कार पुढील वर्षी लाँच करण्याचा दावा केला जात आहे.