Electric Car : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे. आता या यादीत नव्या नावाची भर पडणार आहे. लवकरच Volvo कंपनी देशात आपली दुसरी लक्झरी इलेक्ट्रिक कार आणणार आहे. कंपनीच्या या कारचे नाव Volvo EX90 आहे आणि ही एक लक्झरी इलेक्ट्रिक SUV असेल. जाणून घ्या या कारचे फिचर्स.

अलीकडील अहवालानुसार, कंपनी यावर्षी 9 नोव्हेंबर रोजी Volvo EX90 वरून पडदा उचलू शकते. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी येत्या काही दिवसांत कंपनीकडून अधिकृत घोषणाही केली जाऊ शकते.

उत्कृष्ट डिझाइन आणि वैशिष्ट्ये

कंपनी व्होल्वोची (Volvo) ही लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही उत्कृष्ट डिझाईनसह सादर करणार आहे, फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्टनुसार, या इलेक्ट्रिक कारमध्ये नवीन स्मार्ट डॅशबोर्ड, सर्व डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल प्ले कनेक्टिव्हिटी, गुगल ऑपरेटिंग सॉफ्टवेअर कनेक्टिव्हिटी, पॅनोरामिक सनरूफ, नेव्हिगेशन, मीडिया आणि फोन कंट्रोल, ड्युअल झोन क्लायमेट मिळेल.

कंट्रोल, वायरलेस. चार्जिंग, ऑटोमॅटिक ब्रेक असिस्ट, लेन ब्रेक असिस्ट, स्टीयरिंग व्हीलच्या मागे ड्रायव्हिंग रेंज, स्पीड आणि नेव्हिगेशन आणि इतर अनेक उत्कृष्ट फीचर्स यांसारख्या कमांडसाठी एक लहान स्क्रीन आढळू शकते.

पॉवरट्रेन

75kWh बॅटरी पॅक Volvo EX90 लक्झरी इलेक्ट्रिक SUV मध्ये वापरला जाऊ शकतो. याला दोन मोटर्ससह AWD ड्राइव्हट्रेन मिळते, जे 300kW पॉवर जनरेट करते, जे अंदाजे 402 bhp पॉवर आणि 660 Nm टॉर्कच्या समतुल्य आहे. याच्या मदतीने ही इलेक्ट्रिक कार फक्त 4.9 सेकंदात 100kmph चा वेग पकडू शकते.

याचा (Volvo EX90) टॉप स्पीड 180kmph आणि एका चार्जवर सुमारे 418 kms ची ड्रायव्हिंग रेंज आहे. तसेच, 150kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने, या इलेक्ट्रिक कारची बॅटरी केवळ 40 मिनिटांत 0-80% पर्यंत चार्ज होऊ शकते.