Electric Car :(Electric Car) भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मोठी क्रेझ आहे. यामुळे सध्या अनेक कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये उतरत आहेत. सध्या Volvo (Volvo)ही कंपनी लवकरच आपली XC40 Recharge ही प्रीमियम इलेक्ट्रिक कार (EV) बाजारात आणणार आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

Volvo XC40 Recharge ही प्रीमियम सेगमेंटची इलेक्ट्रिक कार आहे. इलेक्ट्रिक वाहनांनुसार, ही कार एका चार्जमध्ये 400 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.

व्होल्वोची XC40 रिचार्ज (XC40 Recharge) ही प्रीमियम सेगमेंटची इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये कंपनीला 12-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टू-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जिंग, लेदर अपहोल्स्ट्री यांसारख्या अनेक प्रीमियम फीचर्स देखील पाहायला मिळतील. एवढेच नाही तर कंपनीने ही कार कॉम्पॅक्ट मॉड्युलर आर्किटेक्चरवर बनवली आहे.

Volvo XC40 Recharge (XC40 Recharge) च्या बॅटरी पॅकबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये 78kWh बॅटरी वापरली आहे. ही लिथियम आयन बॅटरी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ही कार एका चार्जमध्ये 400 किमी पर्यंत चालवता येते, परंतु जर आपण वास्तविक ती 350 किमी पर्यंत सहज धावू शकते.

व्होल्वोने ही इलेक्ट्रिक कार गेल्या वर्षीच सादर केली होती. त्याचे प्री-बुकिंग देखील जून 2021 पासून सुरू झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती कार ऑक्टोबर महिन्यापासून विक्री आणि वितरणासाठीही तयार होईल. दरम्यान, कंपनी 26 जुलै रोजी ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.