Electric Car : टाटाने नुकतीच आपली टाटा टिआगो ही इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणली आहे. टाटाच्या या कारला ग्राहकांकडून प्रचंड पसंती मिळाली आहे. या कारचे बुकिंग सुरु झाले असून, पहिल्याच दिवशी या कारची जोरदार बुकींग झाली आहे.

टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक हॅचबॅच कार Tiago  (Tata Tiago) लाँच केली. ज्याचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशी 10000 हून अधिक लोकांनी या (Electric Car) कारचे बुकिंग केले आहे. ही कार बुक करण्यासाठी ग्राहकांना 21,000 रुपये टोकन मनी भरावे लागतील. लॉन्चच्या वेळी घोषित करण्यात आलेल्या या कारची किंमत आधी फक्त 10,000 बुकिंगसाठी होती.

आणखी 10,000 ग्राहकांना सुरुवातीची किंमतही मिळेल

टाटा मोटर्सने (TATA) याआधी या कारची किंमत केवळ 10,000 सुरुवातीच्या ग्राहकांसाठी कमी ठेवली होती, जी आता पुढील 10,000 ग्राहकांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. म्हणजेच आता बुकिंग केलेल्या पुढील दहा हजार ग्राहकांनाही कमी किमतीत कार खरेदी करता येणार आहे.

Tata Tiago EV दोन बॅटरी पॅकसह येते

Tata Tiago EV ला 19.2kWh आणि 24KWh च्या दोन बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. ही कार 19.2kWh बॅटरी पॅकसह 60bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क निर्माण करते. या बॅटरी पॅकसह, ही कार 250km पर्यंतची रेंज देते.

Tata Tiago EV ची वैशिष्ट्ये

नवीन इलेक्ट्रिक कार XE, XT, XZ+ आणि XZ+ टेक लक्स या चार ट्रिममध्ये येते. या कारमध्ये पुश बटण स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, केबिनमधील कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स यांसारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये आहेत. या कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल.