Electric Car : इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी वाढत चालावी आहे. यामुळे अनेक कंपनी यामध्ये आपली गुंतवणूक करत आहेत. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर या इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील.
Tata Nexon EV
Tata Nexon EV भारतात प्राइम आणि मॅक्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक कारची विक्री गेल्या महिनाभरात सर्वाधिक झाली आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीने या कारच्या 2,847 युनिट्सची विक्री केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे.
टाटा टिगोर EV
टाटा मोटर्सच्या (Tata) या कॉम्पॅक्ट सेडान इलेक्ट्रिक कारने गेल्या महिन्यात 2022 मध्ये Tigor EV च्या 808 युनिट्सची विक्री केली आहे. या कारमध्ये 26 kWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिसतो. देशातील या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 12.24 लाख रुपये आहे.
MG ZS EV
एमजी मोटरच्या या इलेक्ट्रिक कारचे अपडेटेड व्हर्जन यावर्षी लॉन्च करण्यात आले. कंपनीने गेल्या महिन्यात या कारचे 412 युनिट्स विकले आहेत. या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 22.58 लाख रुपये आहे.
ह्युंदाई (Hyundai) कोना इलेक्ट्रिक
Hyundai ची ही इलेक्ट्रिक SUV 39.2 kWh च्या लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते. गेल्या महिन्यात कंपनीने या कारचे 121 युनिट्स विकले आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 23.84 लाख रुपये आहे.
BYD e6
चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याच्या (BYD) या कारमध्ये 71.7 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिसत आहे. ही एक एमपीव्ही कार आहे, ज्याची गेल्या महिन्यात 63 युनिट्सची विक्री झाली. या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 29.15 लाख रुपये आहे.