Electric Car : (Electric Car) पेट्रोलला उत्तम पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार सध्या जोरात फॉर्ममध्ये आहेत. पण फक्त पेट्रोलचा खर्च वाचतो म्हणून नव्हे तर इलेक्ट्रिक कारमुळे होणाऱ्या अनेक फायद्यांमुळे.(Benefits) जाणून घ्या इलेक्ट्रिक कारच्या या फायद्यांबद्दल.

कमी खर्चात लांब अंतर

इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमचा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. 100 किमी अंतर कापण्यासाठी पेट्रोल (Petrol Free) कारची किंमत 600 ते 800 रुपये आहे, तर इलेक्ट्रिक कारला एवढे अंतर कापण्यासाठी 100 रुपयांपेक्षा कमी खर्च येईल. अशा प्रकारे, तुम्ही दर महिन्याला इंधन खर्चावर हजारो रुपयांची बचत करू शकता.

पुन्हा पुन्हा पेट्रोल भरण्यापासून सुटका

इलेक्ट्रिक वाहनांचा एक फायदा म्हणजे ते घरबसल्या चार्ज करता येतात. मात्र इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी पुन्हा पुन्हा इंधन पंपावर जावे लागते. तथापि, लांबच्या प्रवासात ईव्ही चार्ज करताना तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते कारण ते चार्ज करण्यासाठी देशात पुरेशी पायाभूत सुविधा नाही. पण देश या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

देखभालीचा खर्चही कमी आहे (Low Maintanace)

इलेक्ट्रिक कारची सर्व्हिसिंग करण्यासाठी देखील खूप कमी खर्च येतो. कारण त्यात इंजिन मेन्टेनन्स, इंजिन ऑइल अशा गोष्टींचा खर्च येत नाही. ही वाहने इलेक्ट्रिक मोटरवर चालतात ज्यांना विशेष देखभालीची आवश्यकता नसते. अशा प्रकारे, त्याची देखभाल खर्च देखील मोठ्या प्रमाणात कमी होतो.

शासन अनुदानही देते

विविध राज्यांमध्ये FAME-2 योजनेअंतर्गत, सरकार ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सबसिडी देखील देते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यापूर्वी सरकारच्या या योजनांची माहिती करून घ्या.