Electric Car : (Electric Car) MG मोटर इंडिया लवकरच बारात आपली मिनी इलेक्ट्रिक कार (Mini Car) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार लॅम्प पल्ल्याच्या प्रवासासाठी नसून शहरी वाहतुकीसाठी योग्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

MG motor India (MG Motor India) भारतीय कार बाजारात चांगली कामगिरी करत आहे, तर कंपनी भारतीय कार बाजाराचा भाग काही वर्षांपासून आहे आणि पुढील वर्षी ही कंपनी भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आणि जर ही कार लॉन्च झाली तर ही कार भारतातील MG ब्रँडची पाचवी कार असेल.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांच्या मते, ही कार इतर कार्सप्रमाणे लांबच्या प्रवासापेक्षा शहरी भागात वापरण्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. आकाराने लहान असल्याने अधिक गर्दीच्या ठिकाणी आणि कमी अंतरासाठी ते सहज वापरता येते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये या कारची चाचणी सुरू आहे. आणि अशी अपेक्षा आहे की ही कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केली जाऊ शकते. ही कार Wuling Honguang EV वर आधारित आहे, जी चीनमध्ये (China) विकली जात आहे. पण या कारचे डिझाईन अतिशय सुंदर बनवण्यात आले आहे.

पॉवर, रेंज आणि कार आकार

एमजीची ही छोटी कार (Mini Car)दोन बॅटरी पर्यायांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. 30kW (40.23 Bhp) असलेल्या पहिल्या EV ची रेंज सुमारे 200 किमी आणि दुसरी 50kW (67.05 Bhp) ची रेंज सुमारे 300 किमी असू शकते.

दोन्ही कारमध्ये एकच मोटर पर्याय असेल. दुसरीकडे, या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, तिची लांबी 2,974 मिमी, रुंदी 1,505 मिमी आणि उंची 1,631 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस सुमारे 2,010 मिमी आहे. चार लोकांची क्षमता असलेल्या या कारला तीन दरवाजे असतील.