Electric Car : नामांकित कार निर्माता कंपनी मर्सिडीजने (Mercedes) आपली इलेक्ट्रिक कार सादर केली होती. आता या कारचे वितरण देखील सुरु झाले आहे. ही कार भारतामध्ये बनवली गेली असून, जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

हे पण वाचा :- स्वस्तात मस्त, जबरदस्त रेंज देते ही इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या

गेल्या महिन्यात जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीजने भारतात एक नवीन लक्झरी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. Mercedes Benz EQS 580 4Matic नावाची ही कार एक उत्तम इलेक्ट्रिक सेडान आहे. त्याचे पहिले युनिट आता वितरित करण्यात आले आहे. मर्सिडीजच्या या लक्झरी इलेक्ट्रिक सेडानची पहिली डिलिव्हरी डॉ. रिधम सेठ आणि डॉ. पूजा सेठ या जोडप्याने स्वीकारली आहे.

“मेड इन इंडिया”

मर्सिडीजची ही लक्झरी इलेक्ट्रिक (Electric Car) सेडान ‘मेड इन इंडिया’ आहे. पुण्यातील कंपनीच्या प्लांटमध्ये ही कार तयार केली गेली आहे.

हे पण वाचा :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकरीची उत्तम संधी.. 

फीचर्स

देशातील पहिल्या लक्झरी इलेक्ट्रिक सेडानला कंपनीने उत्तम डिझाइन दिले आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, स्मार्ट ट्रंक ओपनर, हीटेड विंग मिरर, एलईडी डीआरएल, ब्रेक असिस्टसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हिल होल्ड कंट्रोल, कीलेस सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, 360 डिग्री आहे.

पार्किंग असिस्ट कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, अॅप कनेक्टिव्हिटी, फ्रंट आणि रिअर कप होल्डर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर अनेक उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

पॉवरट्रेन

या लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये 4 मोटर सेटअप आणि 107.8 kWh क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. यासह, ही इलेक्ट्रिक कार 516 bhp पॉवर आणि 855 Nm टॉर्क मिळवते. कारला 0-100 किमी प्रतितास वेग येण्यासाठी फक्त 4.3 सेकंद लागतात आणि तिचा सर्वाधिक वेग 210 किमी प्रतितास आहे.

ट्रान्समिशन: या इलेक्ट्रिक कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. तर सिंगल चार्जिंगमध्ये, या लक्झरी इलेक्ट्रिक कारला 850-857 किलोमीटरची उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळते.

हे पण वाचा :- ही आहे बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या खासियत..