Electric Car :(Electric Car) स्कोडाने नुकताच Concept Vision GT (Concept Vision GT)या कारचा स्केच सादर केला आहे. या कारचे लुक्स आणि डिजाईन अप्रतिम असून ही एक रेसिंग कार आहे. जाणून घ्या या जबरदस्त कारचे सर्व फीचर्स.

कार निर्माता स्कोडा (Skoda)ऑटो लवकरच भारतात अनेक नवीन कार आणणार आहे, ज्यात कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. काही काळापूर्वी, Skoda ने या Vision 7S संकल्पना इलेक्ट्रिक कारचा टीझर सादर केला होता, जी अनेक प्रकारांमध्ये येईल. आता Skoda ने रेसिंग मॉडेल कॉन्सेप्ट व्हिजन GT ची स्केच प्रतिमा सादर केली आहे, जी भविष्यातील एक आगामी रेसिंग कार आहे.

Skoda Vision GT ची रचना 

ही कार Skoda च्या 1100 OHC स्पोर्ट्स मॉडेलची आधुनिक आवृत्ती असेल. ही कार 1957 मध्ये लाँच झाली होती. ही कार दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली जाईल, ज्यामध्ये ओपन-टॉप स्पायडर आणि कूपचा समावेश असेल.

या कारमध्ये शार्प कॅरेक्टर लाईन्स असलेली लो-स्लंग बॉडी दिली जाईल ज्यामुळे कारचा वेग वाढण्यास मदत होते. यात समोरील बाजूस दिवसा चालणारे DRL, LED हेडलाइट्स आणि मागील बाजूस दोन विंग्स देखील मिळतील.

पॉवर

या रेसिंग कारच्या पॉवरट्रेनबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही पण तिला दोन इलेक्ट्रिक मोटर्सचा सपोर्ट असण्याची शक्यता आहे. Skoda ने अलीकडेच व्हिजन कॉन्सेप्ट 7S चे अनावरण केले जे 82kWh बॅटरी पॅकसह 195kW इलेक्ट्रिक मोटरला उर्जा देईल.

ही असतील वैशिष्ट्य

स्कोडा व्हिजन GT (Concept Vision GT) मध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), सिंगल-सीटर केबिन, डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, EBD, ऍक्टिव्ह एरो एलिमेंट्स, नवीन डिझाइन केलेले स्टीयरिंग व्हील, टॉल हूड, फ्रंट एअर स्प्लिटर यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. सुरक्षेसाठी यामध्ये 4 पॉइंट रेसिंग हार्नेस दिला जाईल.

किंमत 

स्कोडा कॉन्सेप्ट जीटी कारच्या किंमतीबाबत सध्या कोणतीही माहिती नाही, मात्र तिची किंमत सुमारे 4 ते 5 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.