Electric Car :(Electric Car) महिंद्रा लवकरच बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आणणार आहे. XUV 400 या कारचे नाव असून 2023 पर्यंत या कारची डिलिव्हरी सुरु होईल. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

महिंद्राने (Mahindra) भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 EV चे अनावरण केले आहे. महिंद्राची ही नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत Tata Nexon EV शी स्पर्धा करेल.

या नवीन SUV चा लूक eXUV300 संकल्पनेसारखा बनवण्यात आला आहे जी महिंद्राने 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केली होती. कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी स्वत: गेल्या महिन्यात या नवीन इलेक्ट्रिक कारच्या अनावरणाची तारीख जाहीर केली होती. नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये काय उपलब्ध आहे ते जाणून घेऊया.

या इलेक्ट्रिक कारचा लूक

ही कार समोरून पाहण्यास अतिशय आकर्षक दिसेल. यासोबतच महिंद्राचा नवीन लोगोही या वाहनात दिसत आहे. नवीन महिंद्रा XUV400 (XUV 400) इलेक्ट्रिक SUV (SUV) महिंद्रा XUV300 पेक्षा आकाराने मोठी आहे. या नवीन एसयूव्हीची लांबी 4.2 मीटर आहे.

Mahindra XUV 400 हे आर्क्टिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये ड्युअल टोन रूफ पर्यायासह सॅटिन कॉपर फिनिशमध्ये ऑफर केले आहे.

पॉवरट्रेन

Mahindra XUV 400 मध्ये IP67 अनुरूप 39.5 kWh बॅटरी पॅक आणि PSM मोटर आहे जी 149.5 PS पीक पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क देते.

रेंज
या कारमध्ये जबरदस्त रेंज पाहायला मिळते. ही कार एका चार्जमध्ये 400-450 किमी धावू शकते. ही कार भारतीय बाजारपेठेतील सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या टाटाच्या नेक्सॉन ईव्ही आणि नेक्सॉन ईव्ही मॅक्सशी स्पर्धा करेल.

या दोन्ही कार सध्या बाजारात चांगल्या विकल्या जात आहेत. Nexon EV ची रेंज 312 kms आणि Nexon EV Max ची रेंज 437 kms आहे. प्रवास करता येईल.

वैशिष्ट्ये

सर्व-नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, एरोडायनामिकली डिझाइन केलेले 17-इंच अलॉय व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, रेन सेन्सिंग वायपरसह ऑटो हेडलॅम्प, टाइप-सी चार्जिंग आउटलेट आणि बरेच काही मिळेल. 60 कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.

कधी बाजारात येईल

सुरुवातीला महिंद्रा 16 शहरांमध्ये XUV 400 लाँच करेल. डिसेंबर 2022 पासून या कारची चाचणी 16 शहरांमध्ये सुरू होईल आणि जानेवारी 2023 च्या अखेरीस या कारची डिलिव्हरी सुरू होईल.