Electric Car : (Electric Car) इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सध्या देशात अनेक कंपनी याकडे वळत आहेत. टाटा नंतर आता MG मोटर (MG Motor)आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. जाणून घ्या या कारचे वैशिष्ट्य.

टेस्टिंग सुरू झाली आहे

वृत्तानुसार, MG Motors आपली वूलिंग एअर इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात परवडणारी(Cheap Car) इलेक्ट्रिक कार म्हणून लॉन्च करू शकते, जी काही काळापूर्वी देशात टेस्टिंग करताना दिसली होती.

रेंज

देशात येणाऱ्या या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी क्षमतेबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण त्याच्या चायना स्पेक व्हर्जनला 30KW बॅटरी पॅक मिळतो, जो 40 hp पॉवर जनरेट करतो आणि 50 kW बॅटरी पॅक जो 67hp पॉवर निर्माण करतो. ही कार 200 ते 300 किमीची रेंज देते.

गाडीची रचना

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारचा आकार मारुतीच्या अल्टोपेक्षा लहान असू शकतो. कंपनी हे ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर तयार करते. चीनमध्ये या कारचे दोन प्रकार विकले जातात, जे स्टॅंडर्ड व्हील बेस आणि लाँग व्हील बेससह येतात. या कारची स्टँडर्ड व्हीलबेस आवृत्ती 2-सीटर आणि लांब व्हीलबेस आवृत्ती 4-सीटर करण्यात आली आहे.

एमजीची ही इलेक्ट्रिक कार चीनमध्येही विकली जाते आणि एमजी लवकरच काही बदलांसह भारतात लॉन्च करू शकते.