Electric Car : भारतीय बाजारपेठेत दररोज नवीन इलेक्ट्रिक कार (EV) लाँच केल्या जात आहेत आणि TATA मोटर्ससह, महिंद्रा अँड महिंद्रा, MG मोटर इंडिया, किया मोटर्स, BYED यासह इतर कंपन्या देखील EV सेगमेंटमध्ये त्यांची उपस्थिती दर्शवत आहेत. दरम्यान, मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या लॉन्चिंगची लोक वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, लवकरच मारुती सुझुकी वॅगनआर इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू शकते. मात्र, कंपनीने वॅगनॉर इलेक्ट्रिकबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
आगामी वॅगनॉर इलेक्ट्रिक (Electric WagonR) लूक आणि फीचर्स तसेच बॅटरी रेंजच्या बाबतीत चांगली सिद्ध होईल. वॅगनर इलेक्ट्रिक एका पूर्ण चार्जवर 250 किमी पर्यंत धावू शकते. तसेच, त्याचा वेगही चांगला असेल. वॅगनॉर ईव्हीची स्पर्धा नुकत्याच लाँच झालेल्या टियागो ईव्हीशी होईल, जी TATA मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.
मारुती (Maruti) सुझुकीने 2020 ऑटो एक्सपोमध्ये आपली भविष्यातील इलेक्ट्रिक कार मारुती Futuro-e शोकेस केली होती आणि तेव्हापासून लोक या कंपनीच्या EV इलेक्ट्रिक कारची वाट पाहत आहेत. आता कंपनी या दिशेने जोमाने गुंतली आहे आणि आगामी काळात ईव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यामुळे, मारुती सुझुकीच्या अनेक इलेक्ट्रिक कार देखील वेगवेगळ्या किंमतीच्या श्रेणींमध्ये येऊ शकतात. मारुती सुझुकीच्या इतर गाड्यांप्रमाणे, इलेक्ट्रिक कार देखील अतिशय परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये येऊ शकतात.