Electric Car : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये अनेक कंपनी प्रवेश करत आहेत. Hyundai आपल्या इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये Hyundai Kona नंतर आता Ioniq 5 इलेक्ट्रिक SUV सादर करणार आहे. जाणून घ्या या कारची खासियत.

दक्षिण कोरियाची कंपनी Hyundai देखील भारतीय बाजारात काही नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai तिच्या सध्याच्या Ioniq 5 इलेक्ट्रिकचे फेसलिफ्ट मॉडेल सादर करेल. याशिवाय कंपनी पुढील 5 वर्षांत इतर अनेक इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणणार आहे.

Hyundai Kona नंतर, कंपनी आपली नवीन Ioniq 5 इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. बातमी अशी आहे की ही इलेक्ट्रिक कार (Ionic 5) पुढच्या वर्षी बाजारात दाखल होऊ शकते. तथापि, कंपनीने अद्याप कोणतीही लॉन्च टाइम लाइन आणि या कारच्या यंत्रणेबद्दल कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही. ही इलेक्ट्रिक SUV 58kWh आणि 72.6kWh च्या 2 बॅटरी पॅकसह उपलब्ध असेल.

त्याचा 72.6kWh बॅटरी पॅक कारला 481 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो आणि 58kWh बॅटरी पॅक कारला 385 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो. कंपनीने या कारमध्ये 800V सुपर-फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे, ज्यामुळे ती 18 मिनिटांत 10-80% पर्यंत चार्ज होऊ शकते.

फक्त 5 मिनिटे चार्जिंग करूनही, कारला 100 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळेल. भारतीय बाजारपेठेत कोणता प्रकार लॉन्च केला जाईल याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झाली नसली तरी, लहान बॅटरी पॅक प्रकार येथे लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.