Electric Car : (Electric Car) फॉक्सवैगन (Volkswagen) ही एक उत्कृष्ट कार कंपनी असून, या कंपनीच्या कार्सला बाजारात मोठी मागणी आहे. फॉक्सवैगनने नुकतीच आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. टेस्टिंग दरम्यान ही कार स्पॉट झाली असून, जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगनने भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्राला MEB प्लॅटफॉर्म वापरण्याचा परवाना दिला आहे, तेव्हापासून या कंपनीची बाजारात बरीच चर्चा होत आहे.

महिंद्राने (Mahindra) 15 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या 5 इलेक्ट्रिक कार या MEB प्लॅटफॉर्मवर तयार केल्या जातील. कंपनी या प्लॅटफॉर्मला INGLO म्हणतात. महिंद्रापूर्वी फोर्ड देखील फॉक्सवॅगनच्या या प्लॅटफॉर्मचा वापर आपल्या कारसाठी करते.

ही आहे फोक्सवॅगनची योजना

अशाप्रकारे फोक्सवॅगन आता भारतातही आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. महिंद्राला प्लॅटफॉर्म परवाना दिल्यानंतर, फोक्सवॅगन भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतही आपले स्थान निर्माण करण्याच्या तयारीत आहे. ज्यासाठी कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतासाठी देखील लॉन्च करू शकते.

टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली कार

काही दिवसांपूर्वीच, फोक्सवॅगनच्या स्कोडा एनियाक iV 80X इलेक्ट्रिक कारची (Skoda Enyaq iV 80X) पुण्यात टेस्टिंग करण्यात आली होती. या कारमध्ये 77 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे.

आता अशी अपेक्षा आहे की 77 kWh चा बॅटरी पॅक Volkswagen ID.4 GTX मध्ये देखील दिसेल. ही नवीन इलेक्ट्रिक कार हाय-एंड कार असेल. ही कार कंपनीच्या आयडी क्रॉझवर आधारित असेल. कंपनीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये या कारचे अनावरण केले होते.

टाटांना तगडी स्पर्धा मिळेल (TATA)

फोक्सवॅगनच्या MEB प्लॅटफॉर्मचा वापर करून, महिंद्रा देशातील इलेक्ट्रिक कार विभागात आपले स्थान मजबूत करण्याच्या तयारीत आहे. हा विभाग आधीच स्वदेशी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सच्या ताब्यात आहे.

टाटाच्या नेक्सॉनची इलेक्ट्रिक व्हर्जन ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. महिंद्राने देशाच्या इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेवर दीर्घकाळ लक्ष ठेवले आहे, जे मिळवण्यासाठी कंपनीने गेल्या महिन्यात आपल्या 5 नवीन इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन केले आहे.