Electric Car : (Electric Car) इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत काळ लक्षात घेऊन अनेक कंपन्या यामध्ये गुंतवणूक करत आहेत. आज टाटाची (Tata) सर्वात स्वस्त (Cheapest Car) इलेक्ट्रिक कार Tata Tiago (Tata Tiago) लॉन्च होणार असून, येणाऱ्या काळात या कारला प्रचंड मागणीसुद्धा होऊ शकते, जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

टाटा मोटर्सची भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये मजबूत पकड आहे. सध्या कंपनी देशात तीन इलेक्ट्रिक कार विकते. आता टाटा मोटर्स आपली पुढील इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही आज 28 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. जाणून घ्या काय असेल या कारची खासियत.

रेंज

Tiago EV मध्ये 26kWh चा बॅटरी पॅक दिसू शकतो. तसेच, यात 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देणे अपेक्षित आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज पाहता येईल. या कारची बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 1 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते.

वैशिष्ट्ये

टाटा टियागो EV वर मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्शन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये पाहता येतील.

किंमत

Tata Tiago (Tata Tiago) EV ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. सध्या, भारतातील सर्वात कमी किमतीची इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. टाटा टियागो इलेक्ट्रिकची किंमत 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Tata Tiago EV ही सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार असल्याने ती भारतीय बाजारपेठेत Tata Tigor EV शी स्पर्धा करू शकते. पण सध्याच्या घडीला ही हॅचबॅक सेगमेंटमधील देशातील एकमेव इलेक्ट्रिक कार असेल.