Electric Car : (Electric Car) इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्यासमुळे अनेक वाहन निर्माता कंपनी यामध्ये गुंतवणूक करत आहेत. आता नामांकित कार कंपनी महिंद्रासुद्धा लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक SUV (SUV) लॉन्च करणार आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

8 सप्टेंबर रोजी, महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra) आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 (Mahindra XUV400) इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे.

आतापर्यंत, देशांतर्गत बाजारपेठेत टाटाच्या इलेक्ट्रिक कारचा दबदबा होता, परंतु महिंद्राची पहिली एसयूव्ही इलेक्ट्रिक कार टाटाच्या इलेक्ट्रिक कार खरेदीदारांसाठी आणखी एक पर्याय उघडेल.

टाटाच्या इलेक्ट्रिक कारची किंमत सर्व इलेक्ट्रिक कारच्या (Electric Car) किंमतीपेक्षा खूपच कमी आहे. पण महिंद्राची (Mahindra) ही एसयूव्ही इलेक्ट्रिक कार टाटाच्या तुलनेत किमतीच्या बाबतीत कुठे उभी आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. तथापि, असा अंदाज वर्तविला जात आहे की ही कार महिंद्रा SUV 300 ची अधिक मजबूत बॅटरी असलेली आवृत्ती असू शकते.

रचना

Mahindra XUV400 Electric च्या डिझाइन आणि फीचर्सबद्दल सर्व प्रकारच्या बातम्या येत आहेत. या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ देखील दिसू शकते. लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर XUV300 प्रमाणे या कारमध्ये हेडलॅम्प आणि बूमरॅंग आकाराचे एलईडी-डीआरएल दिसेल.

XUV300 पेक्षा चांगल्या केबिन स्पेससह, XUV400 ला नवीन डिझाइन केलेले 17-इंच अलॉय व्हील मिळतील. असा अंदाज आहे की महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक SUV मध्ये आधुनिक डिझाइन तसेच नवीनतम फीचर्सचे संयोजन दिसेल.

बॅटरी

LG कंपनीचा 45 kWh पर्यंतचा मोठा बॅटरी पॅक लाँच होणाऱ्या Mahindra XUV400 इलेक्ट्रिक कारमध्ये पाहायला मिळतो. दुसरीकडे, जर रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही कार एका चार्जवर 400 किमी पर्यंत बॅटरी रेंज देऊ शकते. त्याची इलेक्ट्रिक मोटर 150bhp पर्यंत जास्तीत जास्त पॉवर जनरेट करू शकते.

तसेच, Mahindra XUV400 इलेक्ट्रिक कारमध्ये वायरलेस चार्जिंग, रियर एसी व्हेंट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्टसह मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह अनेक एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळू शकतात.  आगामी महिंद्रा XUV400 कारमध्ये Advanced Driving Assistant System (ADAS) देखील दिसू शकते.