Electric Car : (Electric Car) MG मोटर्स लवकरच आपली एक नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार असून, या वर्षीच्या फेस्टिवल सीजन पासून या कारची विक्री सुरु होणार आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.
UK ची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी MG Motors (MG Motors) ने या वर्षी मार्चमध्ये आपल्या ZS (ZS) EV ची अपडेटेड आवृत्ती लाँच केली. एक्साइट आणि एक्सक्लुसिव्ह अशा दोन प्रकारांमध्ये ही कार भारतात लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च झाल्यानंतर आतापर्यंत कंपनी या कारचे फक्त एक्सक्लुझिव्ह व्हेरियंटच विकत होती. तर एक्साईटच्या बेस मॉडेलची विक्रीही आता सुरू झाली आहे.
पॉवरट्रेन
MG ZS EV च्या दोन्ही प्रकारांमध्ये 50.3kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या बॅटरी पॅकसह, ही कार एका चार्जवर 461 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. त्यातील इलेक्ट्रिक मोटर 174 bhp ची कमाल पॉवर आणि 280 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. कार फक्त 8.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.
किंमत
लॉन्चच्या वेळी, MG ZS EV च्या एक्साइट व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 21.99 लाख रुपये ठेवण्यात आली होती आणि त्याच्या एक्साइट व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र अलीकडे कंपनीने त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. आता त्याच्या एक्साइट व्हेरियंटची किंमत 22.58 लाख रुपये आणि एक्सक्लुझिव्ह व्हेरिएंटची किंमत 26.49 लाख रुपये झाली आहे.
वैशिष्ट्ये
एक्साइट बेस व्हेरियंटमध्ये मागील एअर कंडिशनिंग व्हेंट्स, हिल डिसेंट कंट्रोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्लायमेट कंट्रोल, आय-स्मार्ट कनेक्टेड कार वैशिष्ट्य आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या टॉप-स्पेक एक्सक्लुझिव्ह व्हेरियंटमध्ये रियर ड्रायव्हर असिस्ट, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर यासारखी आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.
कोण टक्कर देईल
MG ZS EV भारतीय बाजारपेठेत Tata Nexon EV MAX आणि आगामी Mahindra XUV400 सारख्या इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करेल.