Electric Car : उत्तम लुक्स आणि दमदार स्पेसिफिकेशनसह बेंगळुरूच्या स्टार्टअप कंपनी प्रवेगने आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही कार उत्तम रेंज देण्यास सक्षम असून, जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

एक उत्तम रेंज असलेली नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) लवकरच भारतात दाखल होणार आहे. बेंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी Praveg पुढील महिन्यात देशात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV कार सादर करणार आहे. कंपनीने काही वेळापूर्वी या इलेक्ट्रिकचा टीझर रिलीज केला होता. सध्या कंपनीने या कारच्या नावाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पुढील महिन्यात या कारचे अनावरण होण्याची शक्यता आहे.

रेंज काय असेल?

कंपनीने (Praveg) दावा केला आहे की ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर 500 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल. या कारचा कमाल वेग 200 किमी प्रतितास असेल. ती लक्झरी स्पोर्ट्स कारसारखी बनवली आहे. ही कार फक्त 4.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

डिझाइन

या SUV कारचा (EV) लूक एखाद्या स्पोर्ट्स लक्झरी कारसारखा असेल. त्याच्या पुढील आणि मागील बाजूस अतिशय शार्प लुक देण्यात आला आहे. फ्रंट व्हील आर्कमध्ये फ्लेअर देण्यात आले आहे. त्याच वेळी, मागील बाजूस एक विस्तृत पातळ लाइटबार देण्यात आला आहे. समोरच्या हेडलॅम्पमध्येही अशीच रचना दिसेल. त्याच्या डाव्या मागील फेंडरवर चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. याच्या दाराच्या हँडलला अतिशय आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. या कारमध्ये 5-स्पोक अलॉय व्हील देखील दिले जाईल.

बॅटरी 10 लाख किलोमीटर चालेल

ही कार लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. ही कार जास्तीत जास्त 200 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. तसेच कंपनीच्या दाव्यानुसार ही कार 504 पर्यंत रेंज देऊ शकते. कारला 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात. या कारची बॅटरी 10 लाख किलोमीटरपर्यंत आहे. तसेच यामध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.