Electric Bikes : इंधनाच्या किमतींमुळे, ऑटोमेकर्सचे लक्ष आता इलेक्ट्रिक सेगमेंटकडे वळले आहे. हे पाहता रॉयल एनफिल्डनेही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे आणि आपल्या इलेक्ट्रिक बाइकची चाचणीही सुरू केली आहे. याशिवाय केटीएमने त्यांच्या इलेक्ट्रिक बाइकचीही घोषणा केली आहे.
रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक
कंपनीच्या (Royal Infield) दाव्यानुसार, पुढील 6-8 महिन्यांत इलेक्ट्रिक बाइक सादर केली जाऊ शकते. सध्या कंपनीचे सर्वाधिक लक्ष इलेक्ट्रिक बाईकचा बेस तयार करण्यावर आहे आणि त्याच्या इलेक्ट्रिक बाइकच्या पॉवर रेंजवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनात हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे या बाइकमध्ये उच्च क्षमतेच्या बॅटरीची अपेक्षा केली जाऊ शकते.
बातम्यांनुसार, कंपनी प्रथम इलेक्ट्रिक वेरिएंटमध्ये Meteor 350, Classic 350 आणि Hunter 350 सारख्या बजेट सेगमेंट मोटरसायकल आणणार आहे. तसेच, कंपनी नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे या मोटारसायकली इलेक्ट्रिकवर चालतात आणि बाइकची रेंज, परफॉर्मन्स कॉस्ट कमी करू शकतात. याशिवाय कंपनी चार्जिंग स्टेशन उभारण्याचाही विचार करत आहे.
काही काळापूर्वी Royal Enfield Meteor 350 चे इलेक्ट्रिक (Electric Bikes) वेरिएंट डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसले होते, परंतु कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. वृत्तानुसार, कंपनी पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.
आधीच अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रिक बाइक्स
Revolt RV300, Okinawa सारख्या इलेक्ट्रिक बाइक्स भारतात आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि त्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे.
आगामी इलेक्ट्रिक बाइक्स
आगामी काळात दुचाकी उत्पादक कंपनी बजाज सर्वांची आवडती बाईक बजाज पल्सर देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लॉन्च करणार आहे. तसेच, बजाजने संकेत दिले आहेत की स्पोर्ट बाईक KTM (KTM) चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लवकरच येईल.