Electric Bike :(Electric Bike) आपल्या वेस्पा या जबरदस्त स्कुटरमुळे चर्चेत असलेली LML (LML) कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणणार आहे. दरम्यान लॉन्च होण्याआधीच या बाईकचे (Bike) फोटो समोर आले आहेत. जाणून घ्या या बाईकचे फीचर्स.

लवकरच ही कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक 29 ऑक्टोबर रोजी बाजारात आणू शकते. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की ही हायपर बाईक असेल, जी बाईक आणि स्कूटरचे कॉम्बिनेशन असेल. दरम्यान लॉन्चपूर्वीच या इलेक्ट्रिक बाईकची एक झलक समोर आली आहे. या बाइकचा लूक बाजारातील इतर स्कुटरपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे.

आगामी एलएमएल इलेक्ट्रिक बाइकला (Electric Bike) अतिशय खास स्टाइल मिळेल, जी सुपरमोटो (Supermoto) बाइकसारखी दिसते. याला फ्लॅट बेंच-शैलीतील सीट असून , लहान फ्रंट मडगार्ड, फ्लॅट एलईडी हेडलाइट आणि ओव्हरहेड हँडलबारसह पाहिले जाऊ शकते. बाइकला ट्रेलीस फ्रेम देखील मिळते, जी सामान्यतः KTM सारख्या बाइकवर दिसते.

दरम्यान, एलएमएल इलेक्ट्रिक बाइकवरील (Electric Bike) सर्वात आकर्षक तपशील म्हणजे पेडल्स. हे पेडल्स तुम्हाला मोपेडची आठवण करून देऊ शकतात. आजकाल इलेक्ट्रिक सायकलींमध्येही हे फीचर्स दिले जातात. मात्र या बाईकची कार्यक्षमता उच्च नसणार आहे. पुढच्या चाकामधील डिस्क ब्रेक देखील आकाराने खूपच लहान आहे. या बेईकमध्ये बेल्ट फायनल ड्राइव्ह देखील वापरते, जे सध्या विकल्या जाणार्‍या बर्‍याच परवडणार्‍या इलेक्ट्रिक बाइक्सचे सामान्य वैशिष्ट्य आहे.