Electric Bike : इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेता अनेक कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटकडे वळत आहेत. कावासाकीने (Kawasaki) आपली दमदार इलेक्ट्रिक बाईक सादर केली असून, लवकरच ही बाईक लॉन्च करणार आहे. जाणून घ्या या बाईकचे सर्व फीचर्स.
हे पण वाचा:- मारुती करणार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री, लवकरच लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार
कावासाकी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल (Electric Bike) लॉन्च करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल अद्याप त्याच्या प्रोटोटाइप टप्प्यात आहे. कावासाकीने जर्मनीतील कोलोन येथे इंटरमोट मोटरसायकल ट्रेड फेअरमध्ये प्रोटोटाइपचे प्रदर्शन केले आहे.
कावासाकी 2025 पर्यंत 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक (EV) आणि हायब्रीड मोटारसायकल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कावासाकी मोटर्सचे अध्यक्ष हिरोशी इटो म्हणाले की, कंपनी 2022 पर्यंत जागतिक स्तरावर किमान 3 इलेक्ट्रिक बाइक्सचे अनावरण करेल.
EV प्रोटोटाइप कावासाकीच्या Z250 नेकेड स्ट्रीट मोटरसायकलवर आधारित आहे, जी जागतिक बाजारपेठेत विकली जाते. यात मस्कुलर दिसणारी इंधन टाकी आणि मिनिमलिस्टिक बॉडीवर्कसह आक्रमक हेडलॅम्प देखील मिळतात.
या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये एक चेन ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर वापरली गेली आहे, जी मागील चाक फिरवत राहते. हार्डवेअरच्या बाबतीत, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक आहेत. सस्पेंशनसाठी, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनो-शॉक उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या स्पेसिफिकेशनबद्दल कंपनीने अजून काही खुलासा केलेला नाही.
हे पण वाचा:- ही आहे भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या फीचर्स..