Electric Bike : Motovolt (Motovolt) या कंपनीने आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. URBN (URBN) e-bike असे या इलेक्ट्रिक बाईकचे (Electric Bike) नाव असून, ही बाईक एका चार्जमध्ये जबरदस्त रेंज देते. या बाईकचे बुकिंग फक्त 999 रुपयांमध्ये करू शकता. जाणून घ्या या बाईकचे सर्व फीचर्स.

मोबिलिटी ब्रँड मोटोवोल्टने आपली नवीन ई-बाईक लॉन्च केली आहे. त्याला URBN e-bike असे नाव देण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे तुम्ही ही ई-बाइक फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकता आणि ती पूर्ण चार्जमध्ये 120KM ची रेंज ऑफर करणार आहे. तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन ही बाईक तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

URBN e-bike 

कंपनीने या ई-बाईकची किंमत फक्त 49,999 रुपये ठेवली आहे. Motovolt (Motovolt) कंपनीच्या वेबसाइटवरन आणि 100+ फिजिकल रिटेल पॉइंट्सवर ही बाईक फक्त रु.999/- मध्ये बुक केली जाऊ शकते. किंवा तुम्ही सुलभ EMI हप्त्यांवर देखील खरेदी करू शकता. विशेष म्हणजे ही बाईक चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही परवान्याची किंवा नोंदणीची गरज नाही.

Motovolt URBN या बाईकमध्ये मध्ये BIS-मंजूर बॅटरी आहे. हे पेडल असिस्ट सेन्सरसह येते. यामध्ये पेडल किंवा ऑटोमॅटिक मोडसह अनेक मोड देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की तिची बॅटरी तुम्हाला पूर्ण चार्ज करताना 120KM पर्यंतची रेंज देईल. याशिवाय, यात इग्निशन की स्विच, हँडल लॉक, रियर आणि फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि हायड्रॉलिक रिअर शॉकर्स मिळतात.

URBN e-Bike ही एक एकात्मिक स्मार्टफोन अॅपसह येते. लोकत वाहतुकीसाठी ही एक आदर्श राइड असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याचे वजन फक्त 40kg आहे आणि त्याचा टॉप स्पीड 25kmph आहे. त्याची बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात.