Electric Bike :(Electric Bike) भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढतच चालली आहे. यामुळेच अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत आहेत. IIT Delhi (IIT Delhi) च्या Trove Motor ने इलेक्ट्रिक हाइपर-स्पोर्ट्स बाइक (Sport Bike) बाजारात आणणार आहेत. जाणून घ्या या बाईकच्या सर्व फीचर्सबद्दल.

आयआयटी-दिल्लीमध्ये बनवलेल्या ट्रूव्ह मोटरने (Trove Motor) इलेक्ट्रिक हायपर-स्पोर्ट्स बाइकचा टीझर रिलीज केला असून, या ई-बाईकची प्री-बुकिंग सुरू होणार आहे आणि इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून ती बुक करू शकतात.

200 किमी/ताशी वेगाचा दावा

या पूर्णपणे फेअर इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 200 किमी/तास असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने असाही दावा केला आहे की, केवळ 3 सेकंदात ही बाईक ताशी 0-100 किमी वेग पकडते. या बाइकमध्ये एलईडी अॅडव्हान्स इन्फोटेनमेंट डिस्प्ले, जीपीएस नेव्हिगेशन आणि रीअर टाइम व्हेईकल डायग्नोस्टिक्स यांसारखी इतर अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

हे जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार असून ही जगातील सर्वात सुरक्षित दुचाकी असेल, असे सांगण्यात आले आहे. फुल फेअर व्यतिरिक्त, नेकेड स्ट्रीट बाईक, स्क्रॅम्बलर आणि एंड्यूरो मॉडेल्स येत्या काही महिन्यांत लॉन्च केले जातील.

बाईक दमदार फीचर्ससह येईल

सुपरबाईक पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेनद्वारे चालविली जाते जी 40 किलोवॅट पॉवर निर्माण करणाऱ्या लिक्विड-कूल्ड एसी इंडक्शन मोटरशी जोडलेली आहे. लॉन्चच्या वेळी, ते अल्ट्राव्हायोलेट F77 शी स्पर्धा करेल, ज्याला TVS मोटर कंपनीने निधी दिला आहे.

लेसर लाइटिंग पॅकेज, 360-डिग्री कॅमेरा, TFT टचस्क्रीन डिस्प्ले, कनेक्टेड फीचर्स, ब्रेम्बो ब्रेक्ससह ड्युअल-चॅनल एबीएस, अॅडजस्टेबल सस्पेन्शन आणि इतर अनेक तांत्रिक वैशिष्ट्यांसह ही बाइक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येईल.

ही बाईक दिसायला खूप चांगली आहे, तिचा परफॉर्मन्सही मजबूत आहे आणि फीचर्सची बाब वेगळी आहे. अशा परिस्थितीत कंपनी आपली किंमत किती ठेवते हे पाहणे रंजक ठरेल.