Eknath Shinde :(Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. मात्र या धमकीवर आता एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या धमकीवर एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. माझ्यावर अश्या धमक्यांचा परिणाम होत नाही. यापूर्वीही मला अश्या अनेक धमक्या आल्या आहेत, या गोष्टीचे मला काही अप्रूप नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, या धमक्यांचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पोलीस विभाग (police security) योग्य ती दक्षता घेत आहेत. त्यांना सर्व सूचनाही देण्यात आल्या आहेत. मी एक जनतेमधील माणूस आहे, आणि यामुळे मला कोणीही जनतेमध्ये जाण्यापासून रोखू शकत नाही. असही एकनाथ शिंदे म्हटले.

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आम्ही त्यांचे विचार पुढे नेऊ, एक लढाई तर जिंकली आहेच पण इथून पुढच्याही लढाई आपण जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही काम करणारी लोक आहोत, त्यामुळेच आम्हाला लोकांचे समर्थ मिळत आहे. ही रॅली यशस्वी होणार, हजारोंच्या संख्येने लोक नक्की येतील असही ते यावेळी म्हणाले आहेत.

गेले अनेक दिवस झाले खरी शिवसेना कोणाची यावर वाद सुरु आहे, मात्र लोकशाहीत संविधान हा कायदा असतो, आणि यामुळेच बहुमताला महत्व दिले जाते. राज्यातील प्रमुख आमदारांसह, लाखो लोक आमच्या सोबत आहेत. त्यामुळे ही लढाई आम्ही नक्की जिंकू असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.