Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्योगपती अनंत अंबानी(Anant Ambani) यांच्यामध्ये नुकतीच भेट झाली आहे. अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हा भेट रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर झाली असून, या भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अनंत अंबानी हे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या बड्या व्यक्तींशी भेटी वाढल्या असून, गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांचीदेखील भेट घेतली होती.

दरम्यान उद्योगपतींशी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या गाठीभेटी महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टाटा आणि अंबानीच्या भेटी घेत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांची भेट घेतली आहे. राजकारण्याच्या या भेटी मागील कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, अंबानी (Anant Ambani)आणि शिंदे याच्या भेटीमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी या भेटीदरम्यान अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्यसरकारला आगामी प्रकल्पांसाठी मदत मिळावी म्हणूनसुद्धा ही भेट झाली असल्याचा अंदाज नाकारता येणार नाही.

महाराष्ट्रातून (Maharashtra)वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील अनेक तरुणाचा रोजगार गेल्याची टीका राज्य सरकारवर केली जात आहे. अश्या वातावरणात उद्योगपती अनंत अंबानी आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.