Education Loan : (Education Loan) उत्तम शिक्षणासाठी (Education) अनेकदा परदेशाचा (Abroad) पर्याय निवडला जातो. मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी आपले हे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. अश्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन (Loan) हा उत्तम पर्याय ठरतो. जाणून घ्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोनचे सर्व फीचर्स.

तुमच्या अभ्यास क्षेत्रानुसार कर्जाची रक्कम 1 लाख ते 1 कोटी पर्यंत असू शकते. अनेक बँका भारतात अभ्यासासाठी 50 लाखांपर्यंत आणि परदेशात अभ्यासासाठी 1 कोटीपर्यंत कर्ज देतात.

पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कर्ज देतात.

काही विशेष प्रकरणांमध्ये 100% वित्तपुरवठा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
प्रवास आणि लॅपटॉप यांसारख्या अत्यावश्यक अभ्यास सामग्रीचा खर्च देखील वित्तपुरवठा कव्हर करतो.
कर्जाला लवचिक बनवण्यासाठी बँकांद्वारे सुलभ परतफेडीचे पर्याय दिले जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, परतफेड करण्याची वेळ 12 वर्षे दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे

दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रवेश पत्र
फी संरचना
अर्जदार आणि सह-अर्जदार यांची kyc कागदपत्रे

काही प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा दाखलाही विचारला जातो.

बर्‍याच बँका 4 लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी तारण मागत नाहीत, परंतु 4 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या कर्जासाठी समान तृतीय पक्ष गॅरेंटर आवश्यक आहे आणि 7.5 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी तारण अनिवार्य आहे. परदेशात शिकण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर विमा आवश्यक आहे. एज्युकेशन लोन घेतल्यानंतर लगेच परतफेड करणे आवश्यक नाही. तुम्ही कोर्स पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांनंतर किंवा एक वर्षानंतर पेमेंट सुरू करू शकता. इतकंच नाही तर काही विशेष प्रकरणांमध्ये तुम्ही 5 ते 7 वर्षांसाठी ते वाढवू शकता.