मुंबई : बॉलीवूडमध्ये आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच ‘हिरोपंती 2’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये ‘लैला’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. नवाजुद्दीनच्या या भूमिकेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून त्याचा लूकही इतका दमदार दिसत आहे की, चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

जेव्हा ‘हिरोपंती 2’चा ट्रेलर रिलीज झाला. तेव्हा नवाजुद्दीनच्या व्यक्तिरेखेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी त्याच्या लूकबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिल्या. त्याचवेळी नवाजुद्दीन सिद्दीकीनेही त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा केला आहे की, त्याला चित्रपटातील त्याची ‘लैला’ ही व्यक्तिरेखा खूप वेगळी आणि मनोरंजक वाटली, म्हणून त्याने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट टायगरच्या डेब्यू चित्रपट ‘हिरोपंती’चा सिक्वेल आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेननने मुख्य भूमिका साकारली होती. तर ‘हिरोपंती २’मध्ये टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. हा अॅक्शन चित्रपट एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.